'आई कुठे काय करते' फेम अरुंधतीच्या लेकीचा हटके स्टाईल वाढदिवस साजरा, प्रेरणादायी उपक्रमाचं होतयं कौतुक

Terrasinne
3 minute read
0

मुंबई, 19 मार्च-आई कुठे काय करते  (aai kuthe kay karte ) मालिक छोट्या पडद्यावरील सर्वात चर्चित आणि तितकीच लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेतील अरुंधतीची भूमिकेवर प्रेक्षक जीवापाड प्रेम करताना दिसतात. मालिकेत अरुंधतीची भूमिका अभिनेत्री मधुराणी प्रुभलकर(  Madhurani Gokhale Prabhulkar ) साकारताना दिसते. मधुराणी पडद्यावर तर उत्तम आई साकारताना दिसते पण खऱ्या आय़ुष्यात देखील ती एक उत्तम आई असल्याचे तिनं दाखवून दिलं आहे. अनेकवेळा मधुराणी मुलीसोबतचे व्हिडिओ व फोटो शेअर करताना दिसते. नुकताच तिच्या मुलीचा वाढदिवस झाला. मधुराणीने मुलगी स्वरालीचा वाढदिवस हटके पद्धतीने तर साजरा केलाच पण हा वाढदिवस प्रेरणादायी देखील होता.

aai kuthe kay karte-. मधुराणी पडद्यावर तर उत्तम आई साकारताना दिसते पण खऱ्या आय़ुष्यात देखील ती एक उत्तम आई असल्याचे तिनं दाखवून दिलं आहे. नुकताच तिच्या मुलीचा वाढदिवस झाला. मधुराणीने मुलगी स्वरालीचा वाढदिवस हटके पद्धतीने तर साजरा केलाच पण हा वाढदिवस प्रेरणादायी देखील होता.

अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरने लेकीच्या वाढदिवसाचे काही फोटो व व्हिडिओ शेअर करत या हटके वाढदिवसाची माहिती दिली आहे. मधुराणी प्रभुरकरच्या लेकीचा वाढदिवस यंदा डॉ. सोनम कापसे यांच्या संकल्पनेतून उभारलेल्या टेरासीन मध्ये साजरा करण्यात आला. वाढदिवसाच्या दिवशी स्वारालीला तिच्या मित्र मैत्रिणींसोबत कुकिंग करायचं होतं या हेतूने तशाच पध्द्तीने सजलेल्या एका रेस्टोरंटची शोधाशोध सुरू झाली. याबाबत मधुराणी प्रभुळकर हिने एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात ती म्हणते की, सामाजिक जाणीवपूर्वक जेवण एखाद्या रेस्टॉरंट मध्ये सर्विससाठी कर्णबधीर मुलं आणि बेकर्स ऑटिस्ट (मतिमंद) मुलं! ऐकून आश्चर्य वाटलं नं? आणि हे रेस्टॉरंट आहे तुकाराम पादुका चौक, फर्ग्युसन रोड, पुणे येथे. ही संकल्पना आहे कॅन्सरवर काम करणाऱ्या एका तरुण आणि हरहुन्नरी डॉ. सोनल कापसे हिची. आणि तिला साथ देत तिथे खंबीरपणे उभा असतो तिचा नवरा शैलेश केदारे. सोनम कापसे यांनी समानतेच्या दिशेने एक छोटेसे पाऊल टाकण्याचा निर्णय घेतला. प्रोफेशनल हेल्थकेअर आणि संशोधन तज्ञ शेतकरी आणि अपंग तरुणांना घेऊन “टेरासिन” ची संकल्पना सुरू केली. दरवर्षी स्वरालीचा वाढदिवस काहीतरी वेगळ्या पद्धतीने साजरा व्हावा अशी आमची इच्छा असते. ह्यावर्षी स्वरालीला मित्र मैत्रिणींबरोबर कुकिंग करायचं होतं. त्यामुळे तशी जागा शोधत असताना प्रमोदला हे रेस्टॉरंट सापडलं आणि मुलांनी एक वेगळं जग पाहिलं. त्यांनी कूकिंग केलं, गेम्स खेळले, सांकेतिक भाषा शिकले. आणि हे सगळं प्रमोदच्या कल्पनेतून आणि सोनल उत्साही सहकार्यातून शक्य झालं.

वाचा-माझी तुझी रेशीमगाठमधून प्रसिद्ध कलाकाराची एक्झिट, कोण साकारणार ही भूमिका? VIDEO

ह्या रेस्टॉरंटची काही वैशिष्ट्य असे आहेत की, इथल्या बेकरीमध्ये ऑटिस्ट मुलं काम करतात आणि आपल्याला ही लाजवतीलशी पिझ्झा, कपकेक, चॉकोलेट केक अशी अतिशय उत्तम बेकरी प्रोडक्ट बनवतात. इथली कर्णबधिर मुलं, मुली ही पूर्णतः दुसऱ्यांवर अवलंबून आहेत, शेतकऱ्यांची लेकरं आहेत. आणि ही माता त्यांची राहायची सुद्धा सोय स्वतःच्या हिमतीवर करते. इथे जागतिक खाद्य पदार्थ मिळतात आणि इथल्या पदार्थांसाठी वापरले जाणारे सर्व जिन्नस थेट स्थानिक शेतातून येतात. पुण्याच्या जेवणात आरोग्य आणि चव वाढवण्यासाठी जागतिक पदार्थ बनवण्यासाठी तिने नाचणी, ज्वारी, कोडो, बारनयार्ड, राजगिरा यांसारखे स्थानिक वडिलोपार्जित धान्य घेण्याचे ठरवले. प्रिझर्व्हेटिव्ह, रंग आणि ऍडिटीव्ह नसलेले अन्न इटालियन, चायनीज, भारतीय किंवा मेक्सिकन वैविध्यपूर्ण रेस्टोरंट आहे. आणि ह्याचा अनुभव आम्ही सगळ्यांनी घेतला. इतके वेगवेगळ्या डिशेस त्यांनी दिल्या आणि आम्ही सगळेच नेहमी पेक्षा खूप जास्त जेवलो. पण तरीही कुठेही जडपणा, तडस लागणे हा अनुभव नाही. हे आमच्यासाठी खूपच आल्हाददायक होतं.

PROMOTED CONTENT

सोनम कापसे यांचा विश्वास होता की दिव्यांग व्यक्तींना सहानुभूती नव्हे तर सन्माननीय व्यासपीठ आणि सुरक्षित भविष्य हवे. म्हणून त्यांना मराठमोळ्या जनतेसमोर स्वाभिमानाने आणण्याचे ठरवले. हे फक्त रेस्टॉरंट नाही तर एक अनुभव आहे. अशा विचाराने आणि वेगळ्या ध्येयाने काम करणाऱ्यांना आपण साथ द्या..असं मधुराणी यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. वेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरा केल्याने चाहत्याकडून मधुराणीचं कौतुक होत आहे. शिवाय लेकीवर देखील चाहत्यांकडून वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

वाचा-''मला कधीच चित्रं काढता आली नाहीत.. पण''; कुशल बद्रिकेची मार्मिक पोस्ट चर्चेत

याशिवाय मधुराणीने लेकीसाठी बाला..बाला..या अक्षय कुमारच्या गाण्यावर देखील लेकीसोबत भन्नाट डान्स केला. हा डान्स व्हिडिओ देखील तुफान व्हायरल होत आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)